लेक वाचवा लेक शिकवा

  • 9.9k
  • 2k

गेल्या चार दिवसापासून राणी शाळेत आली नाही म्हणून मोळे गुरुजी तिच्या घरी सकाळी सकाळी भेट दिली. राणी भांडे घासत होती आणि बाजूला धुणे ही पडलेले होते. तिची अजून अंघोळ व्हायचे बाकी होते. तिचा अवतार पाहून मोळे गुरुजीला कसे तरी वाटले. गुरुजींनी तिला सरळ प्रश्न केला, " राणी चार दिवस झाले तू शाळेला का आली नाहीस ? " यावर ती म्हणाली, " सर, आईला बरं वाटत नाही, त्यामुळे आईने मला घरी थांबायला सांगितलं." लगेच मोळे गुरुजी आईकडे वळले आणि विचारलं, " काय झालंय ? " तेंव्हा राणीच्या आईने उत्तर देतांना म्हणाली, " सर माझं तबियत बरोबर राहत नाही. त्यामुळे माझ्याने काही काम करवत नाही.