ते तीन तारे !

  • 10.3k
  • 2.6k

तुम्ही ते तीन तारे पाहीलेत का? रात्रीच्या काळ्याभोर आकाशात नेहमी लखलखताना दिसणारे! मी गावी गेल्यावर मला ते नेहमी तिथल्या आकाशात लखलखताना दिसतात! पण इकडच्या मुंबईतल्या आकाशात साधा एखादा तारा नावाला ही कुठे दिसत नाही! असो, मुंबईतल्या आकाशात तारे शोधणं म्हणजे समुद्रातून मोती शोधण्यासारखं आहे. पण तरीही बहूधा आजकालच्या लाॅकडाऊनमुळे प्रदूषण नियंत्रणात आल्याने मुंबईत तारे दिसण्याची संख्या बऱ्यापैकी वाढताना दिसतेय, आणि आज तर चक्क मला ते तीन तारे दिसले आणि तेही इथे.......मुंबईत! हुश्शऽ.....! खूप भारी वाटलं त्यांना पाहील्यावर, अगदी खूप दिवसांनी आपलं कुणीतरी भेटल्यासारखं वाटलं! मी लहान असताना माझे आजोबा मला नेहमी त्या तीन ताऱ्यांची गोष्ट सांगायचे! ते म्हणायचे की....., हे