सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 5

  • 6.6k
  • 2.5k

पण मी जेव्हा त्यांना सांगितले की, मला रूममध्ये रहायचे नसून मोकळ्या जागेत टेंट टाकून रहावे लागेल तेव्हा मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. मी त्यांना परत विनंती केली तेव्हा त्यांनी विशेष परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यांच्यापैकी एक जण स्वतःहून परवानगी घ्यायला मध्ये गेला. तो पर्यंत अनुयायी आणि माझ्यात काही असा संवाद झाला. - “आप कबसे हैं यहांपर?” मी थोडे भीतच विचारले. “हमार तो जनम ही वाराणसी मे हुआ. कुछ दस साल के थे तबसे इधर हैं.” हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभिमान दिसत होता. कदाचित