भाऊबीजआज जिल्हाधिकारी राधाचे डोळे भरून आले होते. कारण आज भाऊबीजेचा दिवस मात्र भाऊ सुरज या जगात नाही. हे ह्या दिवाळीतील पहिले सण होते तिचे , ती आपली भावाची वाट पाहत होती मात्र भाऊ काही केल्या येऊ शकत नव्हता. कारण नुकतेच झालेल्या बस अपघातात तिच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाला होता. हे आठवण करून करून तिच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते. आज ती एका जिल्ह्याची जिल्हाधिकारी झाली होती मात्र हे सुखाचे क्षण पाहण्यासाठी तिचा भाऊ मात्र जिवंत नव्हता. याच विचारात ती वीस वर्षांपूर्वीच्या त्या जुन्या रामपूर गावाच्या झोपडीमधील दिवसांत गेली. घर कसले ते तर एक झोपडीच होती. घरात आई बाबा आणि एक