कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -१७ वा

  • 8.2k
  • 3.9k

कादंबरी -प्रेमाची जादू भाग – १७ वा ------------------------------------------------ १. ------------------ अंजलीवहिनी घरी आल्या , सुधीरभाऊ आणि त्या ,दोघे ही फ्रेश झाले , तो पर्यत यशच्या आईने सर्वांसाठी चहा तयार करून आणला .. आणि पुन्हा एक चहा –मिटिंग टेबला भवती सुरु झाली . तोच आजींना –यश गेटमधून येताना दिसला . त्या म्हणाल्या .. घ्या चिरंजीव देखील कधी नव्हे तो आज लवकर आलेत घरी , आश्चर्यच म्हणयचे हे.. अंजलीवहिनी म्हणाल्या – असा सहजासहजी लवकर येणाऱ्यापैकी आपला यश नाहीये , नक्कीच काही तरी ठरवून आले असणार महाराज . सुधीरभाऊ म्हणाले – किती अंदाज करताय ? आलाय न तो घरात , चहा घेतांना