मुलगी होणं सोपं नाही - 6 - आजी आणि मामाचे भांडण

  • 5k
  • 2.2k

मामा, मामी घरातुन बाहेर जाऊन जवळजवळ एक तास होत आला होता, तरीही ते पुन्हा घरी आले नव्हते. मी एकटीच घरात होती आणि दरवाजाला बाहेरुन कडी होती. मला बाहेर जाण्यासाठी काही मार्गच नव्हता. मी कोणीतरी येण्याची वाट बघत होती. ताईला पण आज दररोज पेक्षा जास्तच ऊशिर झाला होता. मला घरात गुदमरायला लागले होते. मी जोरजोरात दरवाजा ठोकत होती, जेणेकरुन बाहेरुन कोणी जात असेल तर माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचेल. मी दरवाजा ठोकुन ठोकुन थकली, दोन तीन तास झाले होते, मला काहीच सुचत नव्हते. मला गरगरायला लागले, डोळ्यासमोर अंधार आले आणि मी दरवाजा ठोकता ठोकताच खाली कोसळली. दुपारी तीनच्या सुमारास ताई