सवाशीन

  • 7.6k
  • 1
  • 2.4k

भर दुपारच्या उन्हात एस.टीच्या विनंती थांब्याच्या बाजूला असलेल्या झाडाच्या सावलीत,जमिनीत गेलेल्या जाडजूड मुळावर भिवा जरा टेकला.शेजारी पदराने घाम पुसत त्याची बहिण संगी खांद्यावरून सरकणारी बॅग पुन्हा पुन्हा सावरत उभी होती. भिवा जमीनीवर शून्यात कुठेतरी हरवत , हातात एक काडी घेऊन खालचा पालापाचोळा इकडे तिकडे करत असलेला पाहून संगीला राहवलं नाही.बॅग जमिनीवर ठेवत,तिने त्याच्या हातातून काडी ओढली आणि दूर फेकली,त्याने तरीही मान वर केली नाही.“देख भाऊ वहिनी जाऊन आते महिना झाला,माले बी घर दार आहे, मावश्या बी त्यांच्या घरी गेल्या,आते तुलाच धीर धरना पडीन..माणूस भाई आहे तू,दुसर लगीन कर,नाहीतर जेवा-खावायची सोय बघ..आमचं माहेर तर तुटलं आते.”त्याने वर न बघताच मान हलवली.तेवढ्यात धूळ