येडी_सुनी

  • 6.7k
  • 2
  • 2.3k

#लघुकथा खिडकीच्या बाहेरून ओढा वहात होता,अशक्त पिवळसर उजेड असलेल्या त्या महिलाश्रामाच्या खोलीत बसणं मला नकोसं झालं होतं पण मला ‘तिला’ एकदा पहायचं होतं.गावी पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा माझ्याच वयाची, दहा /अकरा वर्षांची असेल.काळवंडलेला चेहरा,बारीक डोळे,धारदार नाक न तेलाचा बोट नसलेल्या कोरड्या दोन वेण्या.बटनं निघाल्याने घसरत असलेल्या फ्रॉकला पुन्हा खांद्यावर घेत ती उकीरडा चाळत होती. तिला “काय शोधतेय?” विचारल्यावर फाटक्या कोरड्या ओठांमधून वेडगळ पण मनापासून हसत, वसकन तोंडासमोर येत “केसं” एवढंच बोलली. मी घाबरून मैत्रीणमागे लपले. ती म्हणाली-“ अग येडी सुनी य ती” मंदसर,भोळी सुनी उकिरड्यावर,रस्त्यावर केसांची गुंतवळ शोधायची