सैतानी पेटी भाग १

  • 9.8k
  • 1
  • 3.8k

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे) "Happy Birthday to you...Happy Birthday to you Mamma....Happy Birthday to you" असे बोलत रॉबर्टने त्याच्या आईचा स्टेफनीचा ९० वा वाढदिवस साजरा केला आणि एका पुरातन वस्तुंच्या दुकानातून घेतलेली एक पेटी तिला भेट म्हणून दिली. ती पेटी पाहताच स्टेफनी खूपच खुश झाली. ती पेटी ती उघडणार इतक्यात रोबर्टला एक महत्वाचा फोन आला. रॉबर्टने मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागेल आणि मी संध्याकाळ पर्यंत येईन मग आपण बाहेर जेवायला जाऊ असे स्टेफनीला सांगितले आणि तो तिथून निघून गेला. स्टेफनी आणि रॉबर्ट अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात राहत होते. स्टेफनीला पुरातन वस्तू साठवण्याचा व त्याचा इतिहास