प्रारब्ध भाग १०

(12)
  • 6.7k
  • 3.4k

सकाळी जाग आल्यावर सुमनने मोबाईल पाहिला तर आठ वाजले होते . तिने उठून दुध तापत ठेवले आणि परेशला जागे करू लागली . रात्री उशिरा झोपल्याने परेश जागा व्हायला तयार नव्हता . “ये ग तु पण झोपायला परत असे म्हणून तिला खेचू लागला . पण सुमनने त्याचे काही एक ऐकले नाही . त्याला उठवून त्याच्या हातात ब्रश दिला आणि बाथरूममध्य ढकलले . आज मुंबई फिरायला जायची तिला गडबड झाली होती . त्यांचे आवरत आले तोपर्यंत संतोष आणि स्मिता येत असल्याचा फोन आला . सुमनने नाश्ता तयार ठेवला होता ..कांदेपोहे चहा आणि खारी . आज आणखी एका नव्या फ्रॉकचे ओपनिंग केले होते