प्रारब्ध भाग ९

  • 7.2k
  • 3.6k

प्रारब्ध भाग ९ नंतर चार पाच दिवस असेच गेले . सुमन रोज दुपारी स्मिताकडे जात असे . दोघींचे खुप चांगले जमत असे . शिवाय स्मितामुळे सुमनला मुंबईची माहिती मिळत होती . जवळपासची सगळी दुकाने देवळे ही पण स्मिताने तिला चांगली परिचित करून दिली . एके दिवशी स्मितासोबत ती लोकल मधील महिलांच्या डब्यातून तिच्या मैत्रिणीकडे जाऊन आली . लोकलचा प्रवास तिच्यासाठी एक थ्रील ठरला . त्या दिवशी शनिवार होता . स्मिता आज काही कामासाठी बाहेर गेली होती . त्यामुळे सुमन घरीच होती . दुपारी जेवण झाल्यावर ती टीव्ही पहात लोळत होती आणि बेल वाजली . आत्ता कोण आले असेल असा विचार