जोडी तुझी माझी - भाग 4

(11)
  • 20.6k
  • 12.4k

गौरावीला त्यांचं लेडिज टॉयलेट मधलं बोलणं आठवते....पण जाऊ दे आधीच खूप अविश्वास दाखवलाय आणखी नको आणि जर विवेक नव्हताच तिथे तर ते बोलणं पण त्याच नव्हतं, असा मनातच विचार करून ती काहीच बोलत नाही. गौरवी - हो झालंय माझं आता कुठलीच शंका नाही. विवेक - हुश्शश्श..... त्यानी मनातच विचार केला आता हिला परत हॉटेलवर न्यायला नको नाहीतर सगळं पितळ उघडे पडायचं. कसतरी संभाळलय पुन्हा विस्कटेल. आता परत खोटं बोलून विवेकनी आणखी एक बाजी जिंकली. गौरवीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि साध्या भोळ्या स्वभावाचा विवेक फायदा घेत होता. विवेक - बरं काही खाऊन घ्यायचं का आता नाहीतर आणखी भोवळ यायची. गौरवी (काहीसं हसत)