ती कोजागृती पौर्णिमा (भाग-तीन)

  • 11k
  • 4.8k

रात्रीची वेळ.…सौरभच फार्महाऊस...खोलीत विराजच शव बघुन सगळेच स्तब्ध होतात. वातावरणात एक प्रकारची शांतता पसरलेली असते. प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती पसरलेली असते. सगळेच विचारमग्न होतात. आणि तेवढ्यात सौरभला गतकाळात आपण केलेल्या कृत्याची आठवण होते.भुतकाळात...सकाळची वेळ...कॉलेजचा पहिला दिवस..कॉलेजमध्ये मुलांची वर्दळ असते. कुणी आपली बाईक पार्क करत असत तर कुणी आपल्या गृपबरोबर कॅम्पसमध्ये गप्पा मारत असत. सौरभचा गृप सिनिअर असतो. तो नवीन आलेल्या मुलांची ओळख परेड घ्यायला सुरुवात करतो. सगळे स्टाईलमध्ये उभे असतात त्यांच्या समोर काही मुलं मान खाली घालुन उभी असतात त्यांना सौरभ म्हणतो. "काय रे, तुमची नाव काय आहेत?" एक मुलगा घाबरून उत्तर देतो. "माणिक.. माझं नाव माणिक आहे." लगेच