मन हे पाऊसवेडे - तू आणि मी

  • 8.8k
  • 2.6k

सायंकाळी गजबजलेलं मार्केट.. ती चिल्लर खरेदी करत होती... हातात पिशवी होती तिच्या..साडी सांभाळत जाता जाता .. तिने विचार केला ..झालं सर्व खरेदी करुन... चला जावं.. तेवढ्यात तिला गुलाबाची फुलं विकणारा मुलगा आग्रह करायला लागला... आग्रहाखातर तिने गुलाबांचा बंच घेतला अन लगेच दिसलेला गजरा आवडी खातर... आभाळ भरून आले होते.. तिला वाटलं पाऊस येणार .. छत्री बघितली पण पर्स मध्ये नव्हती.. ती स्वतःवरच चिडली आणि लगबगीने निघणर.. तर पावसाचा थेंब आसुसून डोकावला...आणि पावसाचा कोसळणारया धारामधून तिला वाचता नाही आलं....चिंब भिजलेला रस्ता एकदम सुनसान झाला.. ती चालत होती लाल रंगाची शिफॉनची साडी लाल ब्लाऊज.. खोल गळ्याचं... गळ्यात मोत्याचा कंठा काणात मोत्याचे टाॅप्स..लांबसडक केस.. कमरेवर