प्रारब्ध भाग ४

  • 9.6k
  • 4.3k

सासु सासऱ्यांचा प्रेमळ निरोप घेऊन व त्यांचा आशीर्वाद घेऊन सुमन आणि परेश आपल्या सर्व सामानासहीत निघाले . सुमनला सासुचा स्वभाव खुप चांगला वाटला .. अगदी आपल्या मुलीसारखे ती सुमनला वागवत होती . निरोप देताना परेशला पण त्यांनी बजावून सांगितले होते की सुमनला जप,तिला त्रास होऊ देऊ नको . परेशने पण त्यांना तसा “शब्द” दिला होता . त्यामुळे सुमन सुखावली होती .. त्या गावातून तालुक्याला बस होती . आणि तिथून मुंबईची गाडी पकडायची होती . इथे आरक्षण वगैरे प्रकार नव्हता . बस इथुन जिल्ह्याच्या गावाला पोचल्यावर पुर्ण भरून जात असे . या दोघांना मात्र छान जागा मिळाली . परेशने सर्व सामान