सलाम-ए-इश्क़ - भाग - १०

  • 7.7k
  • 3.1k

मध्यरात्री केव्हातरी आदीचे डोळे उघडले..खोलीतले दिवे चालूच होते.कितीवेळ तो तसाच पडून राहिल्याने अंग ठणकत होतं.तो उठून बसला.डोकं अजूनही भणभणत होतं. फोन बंद येत होता.आता मात्र त्याला वास्तवाची जाणीव झाली....हे सगळं आपल्यासोबत खरच झालय आणि आपण आशुला आयुष्यातून कायमच गमावलय ह्या जाणिवेने तो हतबल झाला. मागे टेकून बसला...श्वासांची गती वाढली होती....डोक्यात विचारांची गर्दी गर्दी झाली होती- आशु तू का बोलली नाहीस ह्याबद्दल माझ्याशी...आपण काहीतरी मार्ग काढला असता रे पिल्ल्या...प्रत्येक अडचणीवर मार्ग असतो ना आणि हे असं एकट्याने निर्णय घेण्याचा अधिकार तुला कुणी दिला गं?...तुझं आयुष्य तुझ्या एकटीच राहिलं होतं का? तुझ्या सोबत आता माझंही आयुष्य बांधल गेलं होत ना? मग का