आतल्या खोलीच्या दरवाज्यालगत बायका बसल्या होत्या.उंबरठ्याला टेकून आशु,सीमा आणि तिच्या आणि काही दुसऱ्या चुलत बहिणी बसल्या होत्या. भाऊकाकांनी आपल्या भेदक नजरेने एकदा सगळ्यांकडे पहिले आणि एक गंभीर आवाज गरजला.- कोपऱ्यात बसलेला दिन्याकाका आता मात्र धीर सुटल्यावर चवताळून बोलला-“ ...केलं हुतं..पोरीन लगीन..चूक झाली होती तिची,पण पोरगा जातीचा होता,मराठा होता, चांगला इंजेनेर होता मंबईत...भाऊ पोरीन बघितलय ट्रक सरळ अंगावर घुसला तो....काय चूक व्हती हो त्याची,एकुलता एक होता आईबापाला....तिच्या संग नात तोडलं व्हतच ना आपुन,हे काय राजकारण,समाजकारण नव्हत भाऊ तिचं आयुष्य होत्याचं नव्हतं करायला.. जागेवर संतापाने थरारात भाऊ जणू कडाडलेच – अन राहिला प्रश्न आमच्या तायडीचा माझ्याच घरात नासक फळ आहे म्हटल्यावर कापून