प्रारब्ध भाग २

  • 9.2k
  • 5.2k

प्रारब्ध ..भाग २ मामाने स्टूलवर उभे राहून दाराला तोरण लावुन घेतले . मग मुहूर्तमेढ रोवली ,सगळ्या सुवासिनींनी तिची पूजा केली . लग्न इतक्या तातडीने ठरलेआणि मुहूर्त पण दोन दिवसात लगेच होता त्यामुळे मुहूर्तमेढ आणि साखरपुडा एकदमच होते सुमनने सुद्धा हळदी कुंकू वाहिले आणि नमस्कार केला “आता सर्व्या आया बायास्नी बी नमस्कार कर ग सुमे . मामीला होकार देऊन तिने आधी मामा आणि सगळ्या मोठ्या पुरुष माणसांना अगदी वाकुन नमस्कार केला मग मामीला आणि आलेल्या शेजारच्या बायकांना पण नमस्कार केला . तोवर शेजारच्या तीन चार आज्ज्या पण जमा झाल्या होत्या त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी पण तिची अलाबला घेतली “बायो सुमी तर