सौभाग्य व ती! - 35 - अंतिम भाग

(21)
  • 6.7k
  • 2.5k

३५) सौभाग्य व ती ! एक भयाण जंगल... जिकडे तिकडे झाडीच झाडी! अचानक वाघाची भयाण डरकाळी ऐकू येते. नयन इकडेतिकडे पाहते. तिच्यामागे धावणारा अक्राळविक्राळ वाघ बघून ती जीवाच्या आकांताने धावत सुटली, पाठोपाठ वाघही! थोडे पुढे जाऊन तिने धापा टाकत मागे पाहिल तर काय आश्चर्य तिच्यामागे सदाशिव पळत होता. त्याला पाहून ती थांबते न थांबते तोच पुन्हा कर्णकर्कश्श डरकाळी बाप रे! तो सदाशिव नसून वाघ होता. नयन पुन्हा धावत सुटली. धावतच राहिली. तिने पुन्हा मागे पाहिले. पुन्हा सदाशिव...वाघ...सदा...ती पळतच राहिली एक क्षण