कादंबरी- जिवलगा ...भाग-५० वा -अंतिम भाग

(35)
  • 12.8k
  • 1
  • 5.9k

कादंबरी – जिवलगा भाग- ५० वा अंतिम भाग -------------------------------------------------------- आजकालच्या ट्रेन आपापल्या वेळेनुसार धावत असतात ,त्यामुळे ..ट्रेन लेट झाल्यामुळे होणारा मन:स्ताप खूपच कमी झाला आहे. हेमुचे आई-बाबा ..रेल्वे आणि बस असा संयुक्त प्रवास करून घरी सुखरूप पोंचले. आणि यावेळचा प्रवास अनेक अर्थाने सफल –संपूर्ण झाला आहे असेच दोघांना वाटत होते. दुपारपर्यंत त्यांचे रुटीन सुरु झाले . हेमूच्या बाबांनी ऑफिस मध्ये जाऊन .. स्टाफला सत्कार समारंभात मिळालेले गौरव चिन्ह ,सन्मानपत्र , शाल-श्रीफळ दाखवले ,खूप छान कार्यक्रम झाल्याचे ऐकून सगळ्यांना आनंद झाला ..हेमूच्या बाबांचे सर्वांनी अभिनंदन केले . शाळेतील शिक्षकांची आणि मुलांची भेट उद्या सकाळी घेऊ या .असे ठरवून हेमुचे बाबा घरी