हॅलो.....? कसे आहात सगळे........ सर्वांना दिवाळीच्या खूप - खूप शुभेच्छा.....??☺️☺️ तुम्हाला प्रश्न पडलाय ना मी कोण...?? तर मी माझी ओळख करून देते..... मी अवनी सहस्त्रबुध्दे.... एका मोठ्या संयुक्त - कुटुंबातील कन्या.... अहो पण तुमच्या माहितीसाठी सांगते.... आमचं कुटुंब जरी संयुक्त असलं तरी, खूप पुढारलेले विचार जपणारं आहे बर का....! कळेलच तुम्हाला मी अस का म्हणतेय.....? तर, दिवाळी आलीय येत्या पंधरा दिवसांवर आणि आज पासून आमच्या घरी सगळी कामं निघणार आहेत.... पण, आमच्या घरचे माणसं आणि बाया दोन्ही लैंगिक भेदभाव न ठेवता सगळी कामं एकत्र मिळून करतात... म्हणजे जर माणसं पेंटिंग करतील..... तर, बाया आधी स्वच्छ करून, त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवणार....