पेरजागढ- एक रहस्य... - १३

  • 8.1k
  • 4k

१३) रहस्याचा थोडाफार खुलासा आणि पवनचे सोनापुरात आगमन...काही दिवसांपूर्वीच मला आपले नातेवाईक सोनापूरला असतात मला असे कळले.आधीपासूनच मी रिलेशनमध्ये कुठे गेलो नसल्यामुळे माझी कित्येकांची ओळखी अशी अर्धवटच होती. त्यामुळे तिथले नाते माझ्यासाठीतरी अपरिचितच होते. काही दिवसांपूर्वी ते गावाकडे आले होते. त्यावेळी माझा आणि त्यांचा परिचय झाला. मला त्यांनी आवर्जून आपल्या गावाकडे यायला सांगितलं आणि यावेळी तशी संधी पण चांगली होती. त्यांचा नंबर बघत मी त्यांना कॉल केला आणि मी येत असल्याचा खुलासा केला. मी येत असल्यामुळे त्यांनी पण आनंदाने मला, अगदी आवर्जून ये म्हणून म्हटलं. कारण त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तरी मी पहिल्यांदाच तिथे चाललो होतो. त्यामुळे जितका आनंद मला तिथे