कादंबरी- जिवलगा ...भाग- ४८ वा

  • 11.5k
  • 5.9k

कादंबरी – जिवलगा भाग-४८ वा ------------------------------------------------- १. आजोबांनी भारतीला चहा करण्यास सांगितल्यावर ..तिच्या मागोमाग बाकीचे महिला मंडळ उठून उभे राहत म्हणाले .. हे पहा ..तुमच्या सोबत हॉलमध्ये बसून ..आम्हा बायकांना तुमच्या गप्पा ऐकत बसायला लावू नका . उठसुठ ते राजकारण , नाही तर ..जगभरातील घडामोडी .. आम्हाला काय कळणार आहे त्यातले .? त्यापेक्षा आम्ही आपल्या बसतो जाऊन ..दुसर्या रूममध्ये .. आमचे विषय आहेत की आम्हाला बोलायला .. चला भारतीच्या आई ..आपण बोलत बसू .. आणि अलका ..तू आहेसच भारतीच्या मदतीला .. हे एव्हढे सगळे बोलणार्या आजीबाईना ..कोण काय म्हणार आहे , नेहाच्या आज्जी आणि आई , भारतीची आई ..रुममध्ये जाऊन