गुंतता हृदय हे!! (अंतिम भाग)

(20)
  • 7k
  • 1
  • 3.2k

समीर आणि गौरी मुबंईला पोहोचले.. शास्त्री काकांनी त्यांना आणायला आधीच गाडी पाठविली होती..त्या गाडीचा ड्राइवर गौरीच्या नावाची पाटी घेऊन उभा होता..दोघेही गाडीत बसले.. समीरने मनात विचारही केला नव्हता की, इतक्या लवकर तो परत मुबंईला येईल.. कारण काहीही असुदेत, पण तो पुन्हा मुबंईत आला होता..हे मात्र खरे.. जिथे त्याच्यासाठी सगळीकडे फक्त आर्याच्या आठवणी भरल्या होत्या.. गौरी अजूनही शांतच होती..तिने गाडीमध्ये हलकेच स्वतःचे डोके समीरच्या खांद्यावर ठेवले..समीरने ही तिला आधार दिला.. काही वेळातच गाडी हॉस्पिटलसमोर येऊन थांबली..ते दोघे गाडीतून खाली उतरले..त्यांचे सामान गाडीतच होते.. ड्रायव्हरला शास्त्री काकांनी आधीच सूचना दिल्याप्रमाणे तो त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये सोडून त्यांचे सामान घेऊन आर्याच्या घरी ते सामान