कादंबरी - प्रेमाची जादू -भाग -१५ वा

  • 8.3k
  • 3.7k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग-१५ वा ------------------------------------------------- १. ------------------ मधुरा यशच्या केबिन मध्ये आली ..यश ने तिला खुर्चीत बसण्याची खुण करीत म्हटले .. आज कसे काय येणे केले ? सकाळी सकाळी ? ठीक आहे ना सगळं ? खुर्चीत बसत ती म्हणाली .. सॉरी -मी, तुला अरे यश , असेच म्हणून सुरुवात करू का ? अहो यश ..हे खूप बोजड वाटते आहे मला , तरी पण विचारून घेते ..आणि मगच एकेरी नावाने बोलेन . खुर्चीत आरामशीर बसत यश म्हणाला – आपण समवयस्क फ्रेंड्स आहोत ..आणि हेच मैत्रीचे नाते आपल्यात असायला हवे आहे.. तुला सुद्धा या भावनेतून आपले हे मैत्रीचे नाते आवडेल