समर्पण - २८ (अंतिम भाग)

(22)
  • 7.2k
  • 3.1k

एक किनारा उस पार, एक किनारा इस पार है। इतनीसी दुरी दरमियाँ और, न खत्म होनेवाला इंतजार है। कधी कधी खूप जवळ असूनही ते जे थोडसं अंतर असत ना तेच गाठू नाही शकत आपण...आणि ते थोडसं अंतर खूप काही शिकवून जात आपल्याला...विक्रम आणि माझ्या मधात तेच 'थोडसं अंतर' आहे आता...माझ्या आयुष्यातले सगळ्यांत अनमोल क्षण दिलेत विक्रमने मला आणि त्या सोबत दिला न विसरता येणारा भूतकाळ....त्या भूतकाळाला पचवण्याची शक्ती हळूहळू मी आत्मसात केली, किंवा वेळेनुसार त्या जखमा भरत गेल्या आणि त्या जखमांचे व्रण ही मी झाकून ठेवण्यात यशस्वी झाली परंतू असा अचानक विक्रम गायब होईल याची कल्पना केली नव्हती कधीच मी...काय