रविवारची गावरान मेजवाणीकित्येक वर्षानंतर जावई आपल्या घरी येणार आहे ही बातमी ऐकून दामोदर आणि सुनंदा खूपच आनंदात होते. सुमन ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. जिचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी राजेश सोबत झाले होते, जो की शहरातल्या नामांकित कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करत होता. तसे त्यांचे भांडण, वाद विवाद असे काहीच नव्हते मात्र राजेशला कंपनीच्या कामातून सुट्टीच मिळत नव्हती त्यामुळे ते कोठे जाऊच शकत नव्हते. मात्र दोन दिवसापूर्वी सुमनने फोन करून सांगितले की, येत्या रविवारी आम्ही सर्वजण घरी येणार आहोत. हे ऐकून दामोदर, सुनंदा, त्यांचा मुलगा संकेत, सुन लक्ष्मी सारेचजण खूप आनंदी झाले होते. संकेत आणि लक्ष्मीचे दोन लहान मुले देखील