6. बेकार असा जन्म जन्म दिलाय आई माझा गुरु आई कल्पतरु असं सानेगुरुजी म्हणतात. आई गुरुच आहे. कारण ती लहानाचं मोठं करते. आपल्याला उन्हातून सावलीत नेते. दूध पाजते. शिकवते नव्हे तर आपल्यालाही घासही चारुन देते. मायेचा ओलावा देते. आपण रडलोो तर आपले अश्रू पुसते. आणि आपलं सांत्वन करते. कधी वाईट गोष्टी पासून आपल्याला अडवते. संकट आलीच तर स्वतः झेलते. पण आपल्याला काहीही होवू देत नाही. महत्वाचं सांगायचं म्हणजे आई आपल्यासाठी राब राब राबते. आपण मात्र स्वार्थी. आपण थोडेसे मोठे झालोच तर आपले विचार मावत नाही आपल्या मनात. मग याच विचारात कु विचारही येतात आपल्या मनात. मग आई कितीही चांगलं सांगत