प्रेम वेडा (भाग ७)अंकिताला त्या अवस्थेत अनिरुद्धला बघवत नव्हत , त्याला काहीच सुचत नव्हतं की काय करावे अंन काय नाही !!! जितका मोठा धक्का अंकिताला बसला होता तितकाच मोठा धक्का अनिरुद्धला सुद्धा बसला होता !! अनिरुद्धने अंकिताला सावरले व म्हणाला " त्याला बघायला आपण इस्पितळात जाउया का ?? " " त्याला या अवस्थेत मी नाही बघू शकणार " अस म्हणत अंकिता नकार देत होती . " त्याला गरज आहे तुझी , तुला बघताच जगण्याची त्याची इच्छा वाढेल , काय माहिती तो लवकर बरा होईल ??? , काय माहिती तो माणूस फक्त अंदाज लावत असेल की तो वाचू शकणार नाही पण अस्तित्वात काही दुसर असेल