कादंबरी – जिवलगा भाग-४७ वा ------------------------------------------------------------ १. सुट्टीचा रविवार – आराम तर करायचाच असतो , आणि अनेक कामे पण करायची असतात , ती तशीच राहून गेली तर ..ढीग साचून जातो ,कारण एकदा का सोमवारपासून ऑफिस सुरु झाले की मग राहिलेली तशीच राहून जातात , म्हणून किती कंटाळा आला तरी कामे करावीच लागतात . सकाळी सकाळी सोनिया –अनिता –नेहा तिघी एकाच वेळी घरात साफ सफाईच्या कामात गुंतलेल्या पाहून .. हेमूच्या आई म्हणाल्या – मुलींनो ..तुम्ही कामे चालू द्या..आज सगळ्यांच्या नाश्त्याचे मी बघते .. त्यांचे हे बोलणे ऐकून ..सोनिया म्हणाली .. नको नको मामी , असे काही करू नका ..मी जर