पेरजागढ- एक रहस्य.... - १२

  • 9.9k
  • 4.3k

१२) पेरजागढ संशोधन... नमनच्या मृत्यूनंतर मी फार प्रमाणात एकटा पडलो होतो.त्यामुळे सतत कुठे जावे? काय करावे? याचा विचार नेहमीप्रमाणे येतच होता. अशात एक विचित्र घटना माझ्यासोबत घडली होती. शेतात जाताना मी एका शेपटी गळलेल्या नागाचा वध केलेला होता. त्यामुळे मला सतत नाग दिसत असायचे. कधी स्वप्नात तर कधी सत्य रूपात.कित्येकदा कुठे बाहेर जरी फिरायला पडलो तरी दर्शन व्हायचे. या दोन-तीन दिवसाच्या सहवासात "बदला नागिन का" हा सिन चांगलाच अनुभवला. त्यामुळे घरी सगळे ओरडू लागले होते, की नको तसले उपद्रव कशाला करतो हा मुलगा. आता जीव घेतलं त्या बीचाऱ्याचा. कोप झालाय त्या नागमातेचा. आता मागे तर लागणारच आहे. उपासना