कादंबरी - प्रेमाची जादू भाग-१४ वा

  • 10.3k
  • 4k

प्रेमाची जादू कादंबरी भाग -१४ वा -------------------------------------------------------------- यश आणि त्याच्या सोबत मागे बसून जाणारी मधुरा ..मोनिकाच्या डोक्यातच गेली होती .. सगळ्या मुडचा पार कचरा करून टाकला होता तिच्या ,या गावावाल्या पोरीने . त्यात भर म्हणजे.. यशच्या घरातल्या मोठी माणसांचा ,आजी आणि आजोबा यांचा तर तिला जणू पाठिंबाच आहे असे वाटत होते . हा यश पण ना ..त्या फालतू मुलीला तिच्या घरी सोडायला लगेच तयार झाला . काय म्हणावे या मुलाला ..इतका मंदबुद्धी कसा काय असेल हा ? या मोनिकासारखी हॉट मुलगी सोबत आहे , समोर आहे दिवसभर ..पण..माणूस आपल्या दोघात सोशल अन्तर पाळत होता की काय ?असेच वाटतंय , एकूण