प्रेम म्हणजे प्रेम असत- १० पाहता पाहत दिवस पटापट पुढे सरत होते.. काही दिवसातच दोघांनी लग्न केलं.. रितू आणि जय ह्या दोघांचे नाते इतरांपेक्षा जरा वेगळेच होते.. दोघांना नात्यात सगळ्यात जास्त महत्वाची होती ती एकमेकांची साथ आणि ओथंबून वाहणारे प्रेम.... बाकी जय खूप समजूतदार होताच... आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याला माणसाची किंमत जरा जास्तीच होती.. आणि तो आपल्या वागण्या बोलण्यावरून ते रितू ला सतत दाखवायचा...तो शक्यतो रितू दुखावली जाणार नाही ह्याकडे आवर्जुन लक्ष द्यायचा.. रितू सुद्धा आता भूतकाळ विसरून तिचं नवीन आयुष्य नव्या जोमाने चालू करत होती... पण रीतू च्या मनाच्या कोपऱ्यात तिचा भूतकाळ घर करून मात्र बसला होताच...