सौभाग्य व ती! - 30

  • 6.9k
  • 2.7k

३०) सौभाग्य व ती ! जून महिन्याची सकाळ. बाहेर पाऊस पडत होता. पावसाळा तसा अगोदरच सुरू झाला होता त्यामुळे अनेक महिन्यांपासून तापलेली धरित्री सुखावत होती आणि जणू चित्कारत होती. अनेक महिन्यांच्या वियोगानंतर ज्या आवेगाने पतीच्या मिठीत शिरावे त्याप्रमाणे व्याकुळ झालेली पृथ्वी जलधारांना आत खोलवर सामावून घेत सुखावत होती. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती... सकाळी कार्यालयात जावे आणि थकलेली प्रवासभत्त्याची देयके काढून घ्यावीत असे ठरवून रात्री झोपलेला बाळू सकाळी जागा