तिला सावरताना भाग -१

  • 13.7k
  • 1
  • 6k

सोमवारचा सकाळ होती . अलार्म पाचव्यांदा वाजत होता . सकाळचे ९ वाजले होते . घड्याळ बघताच असा जागा झालो जसा की युद्ध सुरू होणार असेल ,आणि शेवटचा सैनिक मीच उरला असेल . लवकर शॉवर घेतली . तयार झालो , बाईक काढली आणि ऑफिसला निघालो . शेवटी अर्धा तास उशीर झालाच . कधीही उशिरा न पोहचलेला मी आज मात्र उशिरा पोहचलो होतो. रवी - " आज सूर्य कुठून उगवला ग रचना ?" रचना चिडवत म्हणाली - " उत्तरेकडून वाटतं..." मग सगळे हसले . मी. - " काय करायचं शेवटी चुकी माणसांकडूनच होत असते . तुमच्याकडून थोडीच होणार आहे ??.." मग