गुंतता हृदय हे!! (भाग ११)

  • 7.5k
  • 3.4k

काही वेळात दोघेही सुखरूप घरी पोहोचले..शास्त्री कुटूंबाने समीरचे खूप खूप आभार मानले.. गौरीने ही काकूंना घट्ट मिठी मारली आणि काल घडलेला प्रसंग सांगितला आणि समीर आल्यामुळे तिला खूप धीर आला हे ही तिने सांगितले.. त्यानंतर गौरी आणि समीर दोघेही फ्रेश झाले आणि काकूंनी दोघांना जेवायला वाढले.. समीर जेवून त्याच्या घरी निघून गेला..गौरी पण आराम करायला तिच्या खोलीत आली.. पण तिला झोप कुठे लागत होती..सारखा कालचा आणि आजचा दिवस तिच्या डोळ्यासमोर येत होता.. इथे समीरची हालत काही वेगळी नव्हती..कालच्या प्रसंगामुळे त्याला इतकं तर नक्की कळलं होतं की, गौरीला त्याच्याबद्दल आकर्षण झालयं म्हणून.. पण याआधी ही खूप मुलींना समिरबद्दल अशी भावना वाटली