तुझाच मी अन माझीच तू...भाग १९ राजस ला आभा चे वागणे अजिबात आवडले नव्हते.. त्याने आभा ला सांगितले होते स्टे अवे फ्रॉम रायन पण त्याकडे दुर्लक्ष करत आभा रायन शी गप्पा मारतांना पाहून राजस चे डोके थोडे फिरलेच होते.. त्याला एक मिनिटे अस्वस्थ सुद्धा वाटले होते.. त्याच्या मनात एक क्षण भीती सुद्धा वाटून गेली होती.. पण त्याने स्वतःला सावरले कारण आभा इतकीही लेची पेची नाही हे राजस ने जाणले होते. अगदीच गरज लागली तर तो तिच्यासाठी असणार होताच पण मुद्दाम आभा शी ह्या विषयावर बोलणे टाळायचे ठरवले...आणि आपले तोंड परत लॅपटॉप मध्ये खुपसले.. आभा सुद्धा काम करत होती..