हा खेळ की खेळखंडोबा

  • 9.2k
  • 2.8k

1. हा खेळ की खेळखंडोबा आम्ही जीवन जगत असताना आताही पाहतो की आजही काही स्रिया जर सोडल्या तर बहुतःश महिला गुलामगीरीतच वागतात. कोणी पतीच्या गुलामगीरीत वागतात. कोणी पुत्राच्या तर कोणी मायबापाच्या. आजही तिची संपत्ती ही तिची राहात नाही. ती त्या तीन घटकाची होते. ज्याप्रमाणे मनुस्मृती मध्ये लिहिलेले आहे. अगदी तशीच अवस्था स्रियांची आजही सुरु आहे. अगदी अनादीकाळापासून. या देशातील स्री कितीही सुशिक्षित झाली तरी तिला स्वतंत्रपणे मत मांडण्याचा जणू अधिकारच नाही असं वाटतं. कारण आमची मानसिकता........ आमची मानसिकता आजही पुरुषांच्या शब्दाबाहेर जात नाही. आमची स्री आरक्षणाच्या शृखलेत पतीनं म्हटलं तर निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात. मग निवडून आल्यावर आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार