सलाम-ए-इश्क़ - भाग-४

  • 8.6k
  • 3.6k

पहाटेचे पाच वाजले होते. ‘स्वप्नशिल्प’ बंगल्याच्या आवारात असलेल्या पारिजातकाचा गंध पहाट गारव्यात मिसळत होता.आदीच्या रूमच्या खिडकीतून पहिलं दर्शन त्या झाडाचं व्हायचं.सकाळी ९ वाजेशिवाय डोळे न उघडणारया आदीला आज पहाटेच जाग आली...चेहऱ्यावरून..एक तलम अबोली ओढणी हळुवारपणे सरकते आहे असा भास त्याला एक अनामिक हुरहूर लावत होता.ह्या नव्या अनोळखी...अनामिक भावनेने त्याला अस्वस्थ व्हायला झालं.तो उठून बसला.त्याच्या बेड जवळची खिडकी अर्धवट उघडी होती.त्याने खिडकी उघडली तसा पारिजातकाचा मोहक सुगंध दरवळला.त्याने एक दीर्घ श्वास घेत तो दरवळ श्वासात भरून घेतला.विस्कटलेले केस,जडावलेले डोळे,अर्धवट जाग-झोप....तो एकटक खाली पडलेल्या पारिजातकाच्या फुलांच्या सड्याकडे बघत होता. ‘किती नाजूक आणि गोड दिसतात ही फुलं...आपण या आधी असं मन भरून ह्याचा