२८) सौभाग्य व ती ! एके काळी एकत्र असलेल्या अण्णा-भाऊंच्या कुटुंबाचे भर वादळात सापडलेले जहाज किनारी लागलं होतं. किनारा मिळताच ज्याला जिथे शरण मिळेल तिथे त्याने सहारा घेवून आपापला संसार थाटला होता, चांगल्या रीतीने फुलवला होता. सारे कुटुंब पुन्हा एकत्र आले नसले तरी एकत्रच असल्यासारखे होते. छोट्या-छोट्या समारंभालाही ते एकमेकांकडे जमून आनंदाने प्रसंग साजरा करीत. त्यांच्यामध्ये मोठे मतभेद नसल्यामुळे एकमेकांना तात्काळ 'ओ' देत. त्या वतनदारी परंपरेलाही एक डाग होता,अपयशाची एक कडा होती ती म्हणजे अण्णांच्या भरकटलेल्या नावेतून