सलाम-ए-इश्क़ - भाग-३

  • 9.7k
  • 4.3k

#सलाम-ए-इश्क़ पार्ट-३ आदि त्याच्या रूममध्ये त्याच्या आवडत्या आराम खुर्चीवर डोळे मिटून बसला होता... रूममध्ये अंधार होता.काळाची चक्र जणू वेगाने मागे फिरत होती...आदिने जे आठवायचं नाही असं खूप वेळा मनोमन ठरवलं नेमकं आज तेच त्याच्या बंद डोळ्यात साठत होत....आठवणी अश्रू बनून गालावर ओघळत होत्या. काळ मागे गेला ....खूप मागे.....कदाचित १४ वर्षांपूर्वी.... सेकण्ड इयर इनटीसी-ब डिविजनचा क्लास कधी नव्हत तो आज पूर्ण भरला होता.प्राचार्यांच मार्गदर्शनपर लेक्चर होतं आणि नेहमीप्रमाणे उपस्थिती अनिवार्य होती.प्राचार्य डॉ.प्रा.देसाई पुढील ३ वर्षांचा इनटीसी इंजिनिअरिंगचा प्रवास कसा असणार आहे त्याबद्दल माहिती देतांना म्हणाले-“Students see to it that you should cover 75% attendance in each semester otherwise you likely to