तुझाच मी अन माझीच तू...भाग १८

(11)
  • 11.8k
  • 1
  • 6.5k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १८ राजस चे वागणे आभा ला जरा विचित्रच वाटले.. त्याचे कालचे वागणे आणि आजचे वागणे ह्यात जमीन आस्मानाचा फरक होता. तिला कळत नव्हत राजस मध्ये एकदम इतका बदल कसा झाला.. आभा ला राजस ला भेटून काही तास झाले होते पण तरीही त्याचे विचार काही केल्या आभा च्या मनातून जात नव्हते. सगळ्या भावनांचा गोंधळ तिच्या मनात होत होता. राजस ने तिच्या साठी आठवणीने फुलं आणली होतीच पण त्याचबरोबर ही चिट्ठी.. "श्या..काय चालूये हे.." आभा ने मनात विचार केला... ऑफिस ची सुरवात अश्या पद्धतीने होईल ह्याची आभा ला कल्पनाच नव्हती. तिची थोडी चीड चीड सुद्धा झाली..