कादंबरी - प्रेमाची जादू भाग - १३ वा

  • 9.3k
  • 3.9k

कादंबरी -प्रेमाची जादू भाग-१३ वा -------------------------------------------------------------------- रात्रीचे जवळपास २ वाजत आलेले होते. यश अगदी टक्क जागा होता .. त्याच्या डोक्यात आणि मनात एकाच वेळी इतका गोंधळ सुरु झालेला होता की ..आता पहाटेपर्यंत झोप येईल असे त्याला वाटत नव्हते . कालचा रविवार मोनिका आल्यामुळे खूप छान होता असे म्हणावे की , आजोबांनी नेमके कालच त्या मधुराला बोलवून गोंधळात भर घातली आणि सगळी मजा घालवून टाकली असे म्हणावे वाटते आहे. आपल्या बाबतीत खरे सांगायचे झाले तर, इतर मुलांच्यासारखं आपल्याला पोरा –पोरींच्या उचापती मध्ये पहिल्यापासून गोडी वाटत नाही , म्हणून इतर पोरं –पोरी थोडेच आपल्यासारखे असणार , ते तर त्यांच्या मनाप्रमाणे वागणार ,