प्रेम - वेडा भाग ४

  • 9.5k
  • 3.6k

प्रेम वेडा (भाग ४)हे सर्व ऐकुन अनिरुद्ध ला नवीनच धक्का बसला होता . अश्या प्रकारच्या कथा त्याने सिनेमात वा एखाद्या कथेतच वाचल्या होत्या . त्याने अंकीताच्या वाढदिवसाची खूप स्वप्न रंगवली होती तिला तो एक सरप्राइझ देणार होता पण आज त्यालाच नियतीने येवढं मोठं सरप्राइझ दिलं होत. ..... त्याला संतोषचा राग येवू लागला होता पण त्याला नशिबानेच शिक्षा दिली होती !त्याच्या समोर आता एकच प्रश्न होता संतोषने अस का केलं ???" तू का केलंस अस ??? तुझ्या अश्या वागण्यामुळे तीन जणांचे आयुष्य खराब केलंस तू !!! अनिरुद्ध ने संतापून त्याला विचारले. " तीन नाही चार " " चार कशे काय ?? चौथी व्यक्ती कोण ??"