मैत्री : एक खजिना ... - भाग 27

  • 7.9k
  • 1
  • 3.2k

27.. .. . . . . .. महिना पालटून गेला होता.... सगळेच मन लावून आपलं आपलं कामं करत होते ऑफिस चे तीन डिपार्टमेंट वाटून देण्यात आले होते अभिजित आणि मानसी मेन डिपार्टमेंट सांभाळत होते सान्वी आणि अविनाश टूर्स आणि ट्रॅव्हल्स चे डिपार्टमेंट सांभाळत होते अनुश्री आणि सुमेध अकाउंट्स चे डिपार्टमेंट सांभाळत होते आणि सावी रिसेप्शन वरील कामकाज बघत होती जो तो मन लावून कामं करत होता अगदी वेळेच काही पडलेलं नव्हतं एका शनिवारी अभि चे डॅड सान्वी च्या घरी आले सगळे बऱ्याच दिवसांनी एकत्र असे निवांत बसले होते अनुराग काका म्हणाले कि आता मुलांचा साखरपुडा करून टाकुयात लग्नाचं पुढे बघूया मग आपले मोठे मंडळी काही शांत बसू शकत नाही अधून मधून बॉम्ब फोडतच राहतात अनुश्री चा तर डॅड बोलणं ऐकून चेहराच पडला अचानक