गुंतता हृदय हे!! (भाग १०)

  • 7.7k
  • 3.4k

ऑफिसच्या काही फॉर्मलिटी पूर्ण करून ती तडक घरी निघाली.. तिला उद्या पासूनच ऑफिसमध्ये रुजू व्हायला सांगितले गेले होते. असो, ती घरी मिठाई घेऊन आली आणि तिने सुमती काकूंना आनंदाची बातमी दिली.. काकूंनी देवाजवळ मिठाई ठेवून नमस्कार केला..मग गौरीने तिच्या बाबांना फोन करून ही बातमी कळवली.. आज सगळं शास्त्री कुटूंब अगदी आनंदात होतं..सुमती काकूंनी रात्री गोडाधोडाचा पण बेत ठरविला.. अरे हो!! गौरीने समीरला ही आनंदाची बातमी कुठे दिलीये..हेच विचारायचं होतं ना तुम्हाला..पण ती देणार तरी कशी!! त्याचा नंबर कुठे होता तिच्याकडे.. कळलं... तुम्ही काय विचार करताय ते.. अहो, पण तुम्हीच विचार करा..ती काकुंकडे कशी काय मागेल समीरचा नंबर..!! मग काय समीरची