सौभाग्य व ती! - 27

  • 7.9k
  • 2.7k

२७) सौभाग्य व ती ! माधवच्या मुलाचे आणि भाऊंच्या नातवाचे बारसे! त्याचा थाट काय वर्णावा? गेलेले वैभव, गेलेली वतनदारी परत मिळविल्याच्या थाटात त्या बारशाचे आयोजन केले होते. गरिबा घरची अनेक लग्न लागावीत असा खर्च सुरू होता. आठ दिवसापासूनच पाहुण्यांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. बाळू व मीनाही आले होते. नयनला सासर सोडून तपापेक्षा अधिक काळ लोटला होता. तप...एक विशिष्ट संज्ञा! तप म्हटले, की आठवते रामायणातील वनवास! रामामुळे सीतेलाही वनवास घडला होता. कलीयुगात नयनलाही वनवास भोगावा लागत होता... सदाशिवमुळे! रामायणातील सीतेला