गुंतता हृदय हे!! (भाग ९)

(14)
  • 8.9k
  • 3.5k

आज सकाळपासून सुमती काकूंची लगबग सुरु होती..त्यांना तर काय करू काय नको असं होत होते..अहो, कारणच तसं होतं ना!! त्यांची मुलगी गौरी चक्क २ वर्षांनी शिक्षण पूर्ण करून घरी येणार होती.. समीर नेहमीप्रमाणे सकाळचा नाश्ता करायला शास्त्री यांच्या घरीच आला.. तेव्हा त्याला कळले की, पुढच्या महिन्यात येणारी गौरी याच महिन्यात भारतात येत आहे..ते पण आजच..त्यालाही काकूंना काही मदत करावीशी वाटत होती..पण तो काय मदत करणार..ह्याच विचारात असताना.. अचानक प्रमोद शास्त्री यांचा समीरला फोन आला..आज एक महत्वाच्या मीटिंगमुळे ते सकाळी लवकरच ऑफिसला गेले होते व गौरीच्या अचानक येण्याच्या बातमीमुळे ते त्यांची मीटिंग पुढे ढकलू शकले नाही आणि आता त्यांना ऑफिसमधून निघणे