सौभाग्य व ती! - 26

  • 6.5k
  • 2.5k

२६) सौभाग्य व ती ! नयन दारात उभी होती. सकाळीच वेदना सुरू झाल्यानंतर मीराला दवाखान्यात नेले होते. सात महिने पूर्ण होतात न होतात तोच तिला अकाली वेदना सुरू झाल्या होत्या. मीरा दिवसभर दवाखान्यात तळमळत होती. माधव तिच्या सोबत गेला होता. त्याने निरोप देताच आशाही दवाखान्यात पोहोचली होती. दुपारी भाऊही दवाखान्यात जाऊन विचारपूस करून आले होते. आईने मात्र दवाखान्यात जायचे नावही काढले नाही. माधव- मीराला आवडणार नाही म्हणून इच्छा असूनही नयन दवाखान्यात गेली नव्हती. मातृत्वाचा गौरव प्राप्त व्हावा