कादंबरी- जिवलगा ... भाग -४५ वा

  • 13.5k
  • 5.7k

कादंबरी –जिवलग भाग-४५ वा ------------------------------------------------------------- दुसरे दिवशी सकाळी बरोब्बर नऊ वाजता ..देसाईसाहेबांची गाडी वकीलसाहेबांच्या घरासमोर थांबली . कारचा दरवाजा उघडीत देसाई साहेब उतरले , आणि त्यांनी मागचा दरवाजा उघडला , आतून मिसेस देसाईना उतरतांना पाहून .. बाहेरच्या बैठकीत ..बसलेल्या ..आजोबांना आणि मोठ्या वकिलसाहेबांना खूपच आश्चर्य वाटले . देसाईसाहेब –आणि बाईसाहेब जोडीने येतील अशी कल्पना केली नव्हती ..त्यामुळे आता सगळा फेरबदल करावा लागणार आहे हे ओळखून ..भूषणदादू आधीच घरात गेला होता ..देसाई फमिली आली हे सांगण्यासाठी. वाड्याच्या मोठ्या दरवाजातून ..मोठे वकीलसाहेब बाहेर आले .. यावे ! यावे ! देसाई साहेब .. चालावे आतच जाऊया आपण सगळे , बाहेरच्या बैठकीत असे फमिली